top of page
All Posts


अनामप्रेम संस्थेचे अंध विद्यार्थी सौदागर लोंढे यांची UGC-NET परीक्षेत उत्तुंग झेप.
दृढ इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीच्या जोरावर अनामप्रेम संस्थेचे माजी अंध विद्यार्थी व सध्या संस्थेत संगीत शिक्षकाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे सौदागर लोंढे यांनी UGC-NET परीक्षेत यश मिळवले आहे.
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम सत्येमव जयते ग्राम प्रकल्पातील थ्री फेज विजेचे काम अखेर पूर्ण
सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पातील मागील 10 वर्षापासूनचा प्रलंबित थ्री फेज लाईट प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात 100 kilowatt क्षमता असलेला ट्रान्सफार्मर बसवण्यात आला आहे. त्याचबरोबर टीमच्या सततच्या फॉलोअपमुळे अंतर्गत पुरवठा करण्याकरिता LT लाईन देखील टाकून पूर्ण झाली आहे.
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम ची विद्यार्थिनी कुमारी सुवर्णा गायकवाड हिचे वकृत्व स्पर्धेत सुयश.
विचार भारती, अहमदनगर च्या वतीने स्वर्गीय नंदकिशोर नातू स्मरणार्थ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वक्तृत्व स्पर्धा - 2025 या स्पर्धेमध्ये अनामप्रेमची इयत्ता नववी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सुवर्णा गायकवाड हिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये तिला विशेष पारितोषिक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटरच्या गणेश बावस्कर याची महाराष्ट्र राज्याच्या T20 क्रिकेट संघात निवड
नॅशनल व्हीलचेअर क्रिकेट चॅम्पियनशिप T20 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा ग्वाल्हेर येथे पुढील महिन्यात होणार आहेत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्यासाठी अनामप्रेम स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटरचा लाभार्थी व कोऑर्डिनेटर गणेश बावस्कर याची निवड केली आहे. गणेशने नुकत्याच पार पडलेल्या व्हीलचेअर वनडे क्रिकेट मंध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघाकडून सर्वात जास्त धावा केल्या होत्या. गणेशच्या निवडीचा अनामप्रेम परिवाराला
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम सत्येमव जयते ग्राम प्रकल्पातील गौरांग अभिनव शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन 'मोठ्या उत्साहात साजरा..
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पामधील गौरांग अभिनव शाळेत स्वतंत्र भारताचा तिरंगी झेंडा फडकवून 76 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आदरणीय प्रमिला कुलकर्णी, डॉ. दिपाली अनभुले, क्रॉम्प्टन कंपनीचे AGM श्री. आनंद कुलकर्णी, मा. दीपाताई कोंबळे, आर्किटेक्ट श्रद्धा अंदुरे, डॉ. स्मिता वाघ, इंजि. उद्धव कराळे, अनामप्रेमचे अध्यक्ष इंजि. अजित माने तसेच सचिव श्री. अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अनामप्रे
anampreminfo
Feb 131 min read


अंध बांधवांसाठी स्वयंचलन कार्यशाळेचे आयोजन
मा.प्रा.योगिता काळे, स.प महाविद्यालय, पुणे व श्री. रघुनाथ बारड, जालना यांचे मार्गदर्शन. अनामप्रेम आयोजित ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त अंधजनांसाठी स्वयंचलन Mobility मनःशांती (Mental Peace), ध्येय निश्चिती (Goal setting) व अपंगांच्या कायदे विषयक कार्यशाळा संपन्न
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत घवघवीत यश
अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत उत्तुंग भरारी - अनामप्रेमची कु. कल्पना कदम हिची उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड. राष्ट्रीय स्तरावरील अंध गोलबॉल स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्रातील गोंदिया येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात यासह देशातल्या विविध राज्यांच्या टीमने भाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाकडून अनामप्रेमची विद्यार्थिनी कु. कल्पना कदम व पुरुष
anampreminfo
Feb 131 min read
bottom of page



