top of page
+91 7350013801
All Posts


सोलर उर्जा प्रकल्प – ऊर्जा स्वावलंबनाचा नवा टप्पा
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प (निंबळक) येथे लायन्स क्लब पुणे विजयनगर यांच्या सहकार्याने कौशल्य विकास केंद्रासाठी स्वतंत्र सोलर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला. दिव्यांग युवक–युवतींच्या प्रशिक्षण व रोजगारासाठी कार्यरत असलेल्या प्रकल्पाला भविष्यात ऊर्जा स्वावलंबन देणारी ही महत्त्वपूर्ण सुविधा ठरली. लोकार्पण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत, विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने आणि प्रकल्पदर्शनासह उत्साहात संपन्न झाला.
anampreminfo
Feb 131 min read


मायेची ऊब” – थंडीग्रस्तांसाठी मदत उपक्रम
अनामप्रेम संस्थेतर्फे थंडीग्रस्त गरीब व दिव्यांग बांधवांना उबदार ब्लॅंकेट व गरम कपड्यांचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी भेट देत बेघर, प्रवासी व असहाय व्यक्तींना मदतीचा हात देऊन मानवतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
anampreminfo
Feb 131 min read


जागतिक अंध दिन – जनजागृती रॅली
अनामप्रेम संस्था संचलित गौरांग अभिनव शाळेत जागतिक अंध दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष मुलांनी प्रेरणादायी घोषणा देत रॅली काढली व समाजात समानता, संवेदनशीलता आणि जागरूकतेचा संदेश दिला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासवृद्धीसोबतच सामाजिक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला.
anampreminfo
Feb 131 min read


पूरग्रस्त दिव्यांग बांधवांसाठी अनामप्रेम संस्थेचा मदतीचा हात
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत अनामप्रेम परिवाराने मानवतेचा सुंदर आदर्श घालून दिला आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना घरपोच किराणा किट, आवश्यक साहित्य आणि मानसिक आधार देऊन त्यांच्यापर्यंत आशेचा किरण पोहोचवला.
anampreminfo
Feb 131 min read


नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर आयोजित नॅशनल पॅरा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025-26
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर आयोजित नॅशनल पॅरा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025-26 या स्पर्धेत अनामप्रेमची कन्या कु. कल्पना कदम हिने अंध विभागातून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक (Gold Medal) मिळवले आहे. कल्पनाच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण अनामप्रेम-स्नेहालय परिवार अभिमानाने गौरवलेला आहे. कल्पनाचे हे यश तिच्या परिश्रम, चिकाटी आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे उत्तम उदाहरण आहे. अनामप्रेम परिवाराकडून कल्पनाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
anampreminfo
Feb 131 min read


श्रावण मासानिमित्त
श्रावण मासानिमित्त अनामप्रेम मधील अंध, अस्थिव्यंग व मूकबधिर विद्यार्थिनींनी श्री. लालगिरी बुवा संजीवन समाधी स्थळ, श्री क्षेत्र मांदळी (ता. कर्जत) व श्री भैरवनाथ मंदिर, बनपिंपरी (ता. श्रीगोंदा) या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट दिली.
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात मा. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्र व दिव्यांग मेळाव्याचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात मा. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्र व दिव्यांग मेळाव्याचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग खुला झाला आहे. कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. हा मेळावा दिव्यांग कल्याणासाठी नवी दिशा ठरला.
anampreminfo
Feb 131 min read


FRST फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा जॅकेट व रेनकोटचे वाटप करण्यात आले
या उपक्रमात फाउंडेशनच्या श्रीमती फराह नाज मॅडम व मा. फतेह रनधवा सर उपस्थित होते. त्यांनी अंध विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खास डिझाइन केलेल्या वस्तूंचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे मा.जे.आर. मंत्री व अनिल गावडे यांनी संस्थेचे कार्य व उद्दिष्टे सविस्तर मांडले या कार्यक्रमास अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मा.डॉ. लतिका नरवडे मॅडम यांची उपस्थिती लाभली.
anampreminfo
Feb 131 min read


चैतन्य फाउंडेशनकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना शेक्षणिक मदतीचा हात..!
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प, निंबळक येथे आयोजित विशेष कार्यक्रमात चैतन्य फाउंडेशनतर्फे संस्थेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. पेन, वही, पाटी, दप्तर, स्केचपेन, पेन्सिल यांसारख्या उपयुक्त साहित्यांनी भरलेली शेक्षणिक किट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत गेली. हा उपक्रम केवळ मदत म्हणून नव्हे तर दिव्यांगांच्या शिक्षणप्रवासाला बळ देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम व IMA यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि सेवा यांचा संगम..!
29 जून रोजी अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प, निंबळक येथे डॉक्टर्स डे निमित्त अनामप्रेम संस्था आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबीरात 17 नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांनी बालरोग, नेत्र, त्वचा, अस्थिरोग, दंतचिकित्सा, मधुमेह, रक्तदाब अशा विविध आजारांची तपासणी केली व आवश्यकतेनुसार औषधोपचारही दिले. दिव्यांग विद्यार्थी, लाभार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
anampreminfo
Feb 131 min read


anampreminfo
Feb 130 min read


हरदिन मॉर्निंग ग्रुपचा २५ वा वर्धापन दिन - समाजसेवेचा मंगल सोहळा
भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपचा २५ वा वर्धापन दिन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या खास दिवशी फक्त आनंदोत्सव न साजरा करता, त्यांनी विविध सेवाभावी संस्थांना - त्यात अनामप्रेम संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे, हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
anampreminfo
Feb 131 min read


वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" प्रावरणप्रेम आणि समाजसेवेचा अनोखा संगम..!
श्री अशोक साळुंखे यांनी त्यांचा ५३ वा वाढदिवस अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात ६३ उपयुक्त वृक्षांची लागवड करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
anampreminfo
Feb 131 min read


हेलन केलर यांची 145 वी जयंती ग्राम प्रकल्पात उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी..!
अनामप्रेम संस्था आणि एक कदम और फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम प्रकल्पामध्ये हेलन केलर यांची 145 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
anampreminfo
Feb 131 min read


रोटरी क्लब कडुन अनामप्रेम संचलित गौरांग अभिनव शाळेला नवीन संगणक संच भेट
अहिल्यानगर मधील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कुणाल कोल्हे तसेच रोटरी क्लबचे संचालक श्री. नितीन धाडे यांच्या माध्यमातून रोटरी क्लबद्वारे गौरांग अभिनव शाळेसाठी नवीन संगणक सेट भेट स्वरुपात मिळाला.
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम संस्थेत जागतिक महिला दिन
अनामप्रेम संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गाचा सन्मान अनामप्रेम संस्थेच्या गांधी मैदानातील हिम्मतभवन प्रकल्पात तसेच निंबळक येथील सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात संस्थेतील दिव्यांगांनी तयार केलेले नॅपकिन बुके व अनामामृत बहुगुणी थेंब ही उत्पादने देऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला.
anampreminfo
Feb 131 min read


अनामप्रेम पुणे वसतिगृहातील अंशतः अंध कु. अनिकेत पाडळे या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले प्रथम स्थान
अमरावती येथे दिनांक 07 मार्च ते 09 मार्च रोजी झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अंशतः अंध असलेला अनामप्रेमचा विद्यार्थी चि. अनिकेत पाडळे याने अप्रतिम कामगिरी करत प्रथम स्थान पटकावले.
anampreminfo
Feb 131 min read


गोकाष्ठ उत्पादन करिता - गो-उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा
मा. अरुण शेठ (भाई) मा. अविनाश बोपर्डीकर इंजि. अजित माने सह अनामप्रेम परिवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न.
anampreminfo
Feb 131 min read
bottom of page




