अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत घवघवीत यश
- anampreminfo
- Feb 13
- 1 min read
अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत उत्तुंग भरारी - अनामप्रेमची कु. कल्पना कदम हिची उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड. राष्ट्रीय स्तरावरील अंध गोलबॉल स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्रातील गोंदिया येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात यासह देशातल्या विविध राज्यांच्या टीमने भाग घेतला होता.
या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाकडून अनामप्रेमची विद्यार्थिनी कु. कल्पना कदम व पुरुष संघाकडून अनामप्रेमचा विद्यार्थी आनंद माळवे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे महिला व पुरुष या दोन्ही संघांनी अभिमानास्पद कामगिरी करत विजेतेपद मिळवले आहे.







Comments